२२ जुलै रोजी चांद्रयानाचे प्रक्षेपण

chandrayaan 2

श्रीहरीकोटा वृत्तसंस्था । भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोतर्फे चांद्रयान-२ या मोहिमेतील यानाचे प्रक्षेपण सोमवार दिनांक २२ जुलै रोजी होणार आहे.

चांद्रयान-२ या यानाचे उड्डाण अगदी शेवटच्या क्षणाला पुढे ढकलण्यात आले होते. तांत्रिक बिघाडामुळे याची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती इस्त्रोतर्फे देण्यात आली होती. यानंतर हे यान नेमके केव्हा झेपावणार याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्‍वभूमिवर, आज इस्त्रोने सोमवार दिनांक २२ जुलै रोजी याचे प्रक्षेपण करण्यात येईल अशी माहिती एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. या दिवशी दुपारी २.४३ वाजता चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार आहे.

Protected Content