धरणगाव (प्रतिनिधी) एकलग्न येथे आज सकाळी जळगाव ग्रामीणमधील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार दौरा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी एकलग्न ग्रामस्थांकडून चंद्रशेखर अत्तरदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे गावातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी गावातिल सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, गटातील शक्ति प्रमुख राजू बडगुजर, बूथ प्रमुख ताराचंद चव्हाण, राजू बडगुजर तसेच गटातील इतर बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.