चंद्रशेखर अत्तरदे यांचे तुरखेडा, आवार ग्रामस्थांकडून स्वागत !

33289078 6237 4949 9531 bb001145fb9a

जळगाव (प्रतिनिधी) अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा आज जळगाव तालुक्यातील तुरखेडा व आवार येथे प्रचार दौरा होता. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

 

आज सकाळी या दोन्ही गावांमध्ये प्रचार दौरा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावातील महिलांनी व ग्रामस्थांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी माजी कृ.उ.बा.स. सभापती लकी अण्णा उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील, गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, ममुराबाद-आसोदा गटातील शक्ति प्रमुख समाधान कोळी, किरण पाटील, बूथ प्रमुख मोरेश्वर सरोदे, विजय सपकाळे, मनेश सपकाळे, राजेंद्र पाटील, किरण पाटील, गोपाल मोरे, सुधीर पाटील, रविंद्र पाटील तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content