मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर मतदार संघाच्या निवडणूकीत सहाव्या फेरीत विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे आघाडीवर असून त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार रोहिणीताई खडसे हे पिछाडीवर आहे. सहाव्या फेरी अखेरीस आमदार चंद्रकांत पाटील यांना 31 हजार 158 मते मिळाली असून रोहिणी खडसे यांना 21 हजार 278 आहेत. यात चंद्रकांत पाटील हे जवळपास १० हजारांनी आघाडी करत आहे.
जळगाव जिल्हाच नव्हे तर राज्यातील सर्वात वलयांकीत मतदारसंघ म्हणून मुक्ताईनगरकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांना अटीतटीच्या सामन्यात पराभूत केल्यानंतर ते शिवसेनेत आणि नंतर शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यांना यंदा पुन्हा एकदा रोहिणी खडसे यांनी आव्हान दिले. चंद्रकांत पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर महायुतीचे उमेदवार म्हणून तर रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या होत्या. यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी दिली होती. तर मोठे शासकीय कंत्राटदार म्हणून ख्यात असलेले विनोद सोनवणे यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उडी घेतली होती. परिणामी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत झाली.
आमदार चंद्रकांत पाटील यांना 31 हजार 158 तर रोहिणी खडसे यांना 21 हजार 278 इतकी मते मिळाली. यात चंद्रकांत पाटील यांना लीड मिळाल्याचे अधोरेखीत झाले आहे. तर, आता मतमोजणी यंत्रांची मतमोजणी होणार आहे. याचे अपडेट आम्ही आपल्याला देणार आहोत.