अमळनेर विधानसभा मतदार संघाच्या सहाव्या फेरीत मंत्री अनिल पाटील आघाडीवर

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये मंत्री अनिल भाईदास पाटील हे अंदाजे ९ हजाराच्या फरकाने लीड करत आहे, शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान सहाव्या फेरी अखेरीस मंत्री अनिल पाटील यांना २८ हजार ३१२ मते मिळाले असून त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार शिरीष चौधरी यांना १८ हजार ४३७ मते मिळाली आहे. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना २ हजार ४९३ मते मिळाली आहे.

अमळनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने अजित पवार गटाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी विलंब झाला. पहिल्यांदा तर ही जागा नेमकी कुणाला सुटणार ? याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. शेवटच्या टप्प्यात ही जागा काँग्रेसला सुटली. या पक्षाने ज्येष्ठ नेते डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी दिली. तर माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी केली. यामुळे येथे तिरंगी लढत झाली. यात प्रचाराच्या दरम्यान अनिल पाटील आणि शिरीष चौधरी यांच्याच जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मतदारसंघातून ६५.६१ टक्के मतदान झाले होते. सहाव्या फेरी अखेरीस मंत्री अनिल भाईदास पाटील यांना २८ हजार ३१२ मते मिळाले, माजी आमदार शिरीष चौधरी यांना १८ हजार ४३७ मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना २ हजार ४९३ मते मिळाली आहे.

Protected Content