Home Cities मुक्ताईनगर Live : मुक्ताईनगरात परिवर्तनाचे वारे- चंद्रकांत पाटील

Live : मुक्ताईनगरात परिवर्तनाचे वारे- चंद्रकांत पाटील

0
62


chandrakant patil muktainagar

जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगरात काहीही कामे झाली नसून आता परिवर्तन निश्‍चीत असून आपण विजयी होणारच असा आशावाद राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर अपक्ष उमेदवारी करणारे चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

मुक्ताईनगरातून राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर अपक्ष उमेदवारी करणारे चंद्रकांत पाटील यांनी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजसोबत संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याप्रसंगी ते म्हणाले की, गत ३० वर्षांपासून मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व एकनाथराव खडसे यांनी केले असले तरी येथे कोणतीही कामे झालेली नाहीत. हा मतदारसंघ दोन नद्यांच्या संगमावरील असून विकासापासून दूर आहे. यामुळे यंदा येथे निश्‍चीतच परिवर्तन होणार आहे. आजच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला निवडणूक लढविण्यासाठी आशीर्वाद दिला असल्याने आता येथून आपला विजय निश्‍चीत असल्याचा दावा त्यांनी केला.

पहा : चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/940459096311022


Protected Content

Play sound