यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चिखली येथील रहिवासी श्रीमती चंद्रकलाताई इंगळे यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागात जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नुकतेच जळगाव येथील कांग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात श्रीमती चंद्रकला इंगळे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप भैया पाटील, अ.जा. विभागाचे जिल्हा अध्यक्ष मनोजकुमार सोनवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी अजा विभागाचे प्रदेश महासचिव राहुल मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष राजू सुवर्णे, जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, जिल्हा सरचिटणीस रामाराव मोरे, यावल तालुका अध्यक्ष शेखर तायडे,मनोहर गुरचळ, ज्ञानेश्वर कोळी, जगदीश गाढे, बबन तायडे, प्रशांत तायडे आदींची उपस्थिती होती.