नवी दिल्ली (वृत्तसेवा ) लोकसभा निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला आहे. प्रचार साभांध्ये विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी एका प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना खतरनाक दहशतवाद्याची उपमा दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबूं नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कट्टर दहशतवादी असल्याची आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. मोदींनी चंद्राबाबूंची तुलना बाहुबली चित्रपटातील भल्लालदेवशी केली होती. त्याच टीकेला उत्तर देताना चंद्राबाबूंनी मोदींची कट्टर दहशतवाद्याची तुलना केली आहे. मदनापल्ले येथे एका रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले, मोदी एक खतरनाक दहशतवादी आहेत. ते योग्य व्यक्ती नाहीत. इथे माझे अल्पसंख्याक भाऊही उपस्थित आहेत. जर तुम्ही पुन्हा मोदींना मतदान केलं, तर तुमच्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात. गोध्रा कांडवेळीसुद्धा 2 हजारांहून अधिक लोकांची हत्या करण्यात आली होती. मी तेव्हाच सांगितलं होतं की, मोदी देशासाठी घातक आहेत. म्हणून मी अशी पहिली व्यक्ती होतो, ज्यांनी मोदींची साथ सोडून एनडीएला सोडचिठ्ठी दिली.