धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीणमधील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांची साळवा ग्रामस्थांकडून आज दुपारी ट्रॅक्टरवरून मिरवणुक काढण्यात आली.
आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावात अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांची साळवा ग्रामस्थांकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण केले. यावेळी जानकीराम पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस तथा सरपंच बांभोरी प्र.चा. राकेश नन्नवरे, साळवा येथील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, नांदेड-साळवा-बांभोरी गटातील शक्ति प्रमुख मोरेश्वर अत्तरदे, सचिन पाटील, साकरे येथील सरपंच राजू कोळी तसेच लक्ष्मण गंगाराम पाटील यांचे असंख्य कार्यकर्तेही उपस्थित होते. तसेच बूथ प्रमुख धिरज इंगळे, रविंद्र बावीस्कर, संदीप गोपाळ, मंगेश, लक्ष्मण सैंदाणे, विनायक भोळे, सीताराम बर्हाटे, जगदीश कोळंबे आणि गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.