राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर

Praful Patel

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या रडारवर आहेत. पटेल यांच्या कुटुंबाशी निगडीत कंपनीने दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मेमन मिर्ची याच्या कुटुंबाशी जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने तपास सुरू केला आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाशी निगडीत ‘मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे ‘मिर्ची’च्या कुटुंबाशी आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप होत आहे. मुंबईत वरळी भागात असलेल्या नेहरु प्लॅनेटोरियमजवळ मोक्याची जागा होती. हा प्लॉट मिर्चीच्या कुटुंबाकडून पटेल यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या ‘मिलेनियम डेव्हलपर्स’ कंपनीला देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ईडी या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे. या प्लॉटवर मिलेनियम डेव्हलपर्सने पंधरा मजली सीजे हाऊस ही इमारत बांधली. ही व्यावसायिक आणि रहिवासी इमारत आहे. मुंबई आणि बंगळुरुमध्ये गेले दोन आठवडे केलेल्या छापेमारीत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे ईडीने हे दावे केले आहेत. या प्रकरणी ईडीने 18 जणांचा जबाब घेतला आहे. डिजिटल पुरावे, ईमेल आणि कागदपत्रंही ईडीने सील केली आहेत.

Protected Content