गुरूदेव सेवा आश्रमात चंडिका महायज्ञ

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गुरूदेव सेवा आश्रमात जगाच्या कल्याणासाठी नुकताच चंडिका महायज्ञ पार पडला.

जामनेर येथे गुरुदेव सेवा आश्रमामध्ये भारत विश्व गुरु होण्यासाठी व जगाचा कल्याणासाठी करण्यात चंडिका महायज्ञ पार पडला असून गेल्या बारा वर्षापासून या यज्ञाचे आयोजन करण्यात येत असते. गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट मध्ये भारत विश्व व्हावा व जन्मकल्याण व्हावा महामारी दूर होऊन जगात सर्वदूर सुख शांती नांदावी यासाठी महंतांच्या हस्ते गेल्या सहा दिवसापासून चंडिका महायज्ञ सुरू असून गेल्या बारा वर्षांपासून गुरुदेव सेवा आश्रम मध्ये श्याम चैतन्य जी महाराज यांच्या माध्यमातून हे चंडिका महायज्ञ केले जाते.

जगामध्ये सुख शांती व त्याचबरोबर जगाचा कल्याण व्हावा या उद्देशाने हा चंडिका महायज्ञ केला जात असल्याचे प्रतिक्रिया गुरुदेव सेवा ट्रस्ट आश्रम चे श्याम चैतन्य महाराज यांनी दिली आहे. या महायज्ञाचा हजारो भाविकांनी दर्शन घेऊन लाभ घेतला.

Protected Content