महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता ; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Garpit

 

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय हवामान विभागाने येत्या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, पुण्यातील वेधशाळेने सुद्धा राज्यात पावसाची शक्यता व्यक्त केली होती.

 

लांबलेला पावसाळा, ऋतुचक्राचे बदललेले वेळापत्रक, गायब झालेली थंडी.. यांचा मागोवा घेत राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती होत आहे. अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाची अतितीव्र क्षमतेची दोन क्षेत्रे एकाच वेळी निर्माण झाली आहेत. कमी दाबाचे हे भोवऱ्यासारखे क्षेत्र अजून राज्याच्या पश्चिम किनाऱ्यापासून बरेच दूर असले, तरी आगामी 12 ते 48 तासांत, त्यांचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची दाट शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

Protected Content