चमगाव येथे बुधवारी वाळूचा लिलाव

valu lilav

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मौजे चमगाव या गावाच्या परिसरात वेगवगेळ्या ठिकाणी साठा करून ठेवलेल्या अंदाजे ४.५ ब्रास वाळूचा लिलाव दि.३१ जुलै बुधवार रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एकुण ४.५ ब्रास वाळू साठ्याचे लिलावा करण्यात येत असून प्रति ब्रास ३ हजार ८४५ या बोली हातची किंमत मा.जिल्हाधिकारी जळगांव यांनी निश्चित केलेली आहे. शासकीय किंमतीपेक्षा जास्त बोली आल्यास, ती उपस्थितांसमोर जाहिर करण्यात येईल व त्या बोलीचा पंचनामा केला जाईल. याबोली पुर्वी २५ टक्के अनामत रक्कम जमा करावी व उर्वरीत ७५ टक्के रक्कम दोन दिवसात शासकीय चलनाद्वारे जमा झाल्यानंतर संबंधिताच्या ताब्यात देण्यात येईल. दरम्यान वाळू साठ्याचा लिलाव घेण्यास जे कोणी इच्छूक असतील त्यांनी या वाळू लिलावावेळी उपस्थितीत राहून भाग नोंदवून शकतात.

Protected Content