चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील रांजणगाव शिवारातल्या एका विहिरीच्या पाण्यात दोन चिमुकल्यांसह आईचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील मनोज पावरा हे वरील ठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्यांचा विवाह मध्यप्रदेश राज्यातील खेडी गावातील ईला यांच्याशी झाला असून त्यांना रितेश पावरा (वय-५) व महेश पावरा (वय-११ महिने) असे दोन मुले होती. दरम्यान घरात हलाखीची परिस्थिती असल्याने सदर पावरा दाम्पत्य ठिकठिकाणी कामे करून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करीत असतात. ते गेल्या महिन्यातच तालुक्यातील रांजणगाव येथे कामाला आले होते. मात्र बुधवार, २९ रोजी रात्री १०:३० वाजताच्या पूर्वी (वेळ निश्चित नाही) अचानक रितेश पावरा, महेश पावरा या चिमुकल्यांसह पत्नी ईला मनोज पावरा (वय- २५) यांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. या घटनेने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा वरील तिघांपैकी एकाचाच मृतदेह पाण्यावर तरंगत होता. त्या मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढताच पती मनोज पावरा यांनी पत्नी व एक मुलगाचा तपास नसल्याचे पोलिसांना सांगितले.
त्यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अजून विहिरीच्या तळाला तपास केला. तेव्हा वरील दोघांचेही मृतदेह मिळून आले. दरम्यान मयताचे कारण अद्याप स्प्ष्ट झालेला नसून वाद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि लोकेश पवार हे करीत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.