चाळीसगाव chalisgaon जीवन चव्हाण । पोलिओमुळे बालपणीच दोन्ही पाय निकामी अन् आई वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी विधवा झाल्याने कुटुंबावर कोसळलेले संकट या दोन्ही आपत्तींनी कुणीही खचून गेले असते. तथापि, चाळीसगावच्या मिनाक्षी निकम या रडल्या नाही, तर लढल्या. जिद्दीने उभ्या राहिल्या. याचमुळे आज त्या दिव्यांगांसाठी रोल मॉडल बनल्या आहेत. त्यांना वसुंधरा रत्न पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त साधलेला हा वार्तालाप आपल्याला नक्कीच प्रेरणा प्रदान करेल…!
मिनाक्षी निकम minkshi nikam यांना नुकताच वसुंधरा रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. या अनुषंगाने प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी वार्तालाप साधला. याप्रसंगी मिनाक्षी ताई म्हणाल्या की, दिव्यांगांकडे पाहण्याचे दृष्टीकोन समाजाने बदलण्याची गरज आहे. आज त्यांना अल्प काळच्या सहानुभूतिची नव्हे तर त्यांच्या हाताला काम मिळण्याची गरज आहे. तर दिव्यांगांनी सुध्दा न रडता लढण्याची तयारी ठेवावी.
आपण स्वत: पोलिओमुळे दोन्ही पाय गमावले आहेत. तर माझ्या आईला वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी वैधव्य आले आहे. तथापि, आम्ही परिस्थितीशी दोन हात केले आहे. यातूनच आम्ही वाटचाल केली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
खालील व्हिडीओत पहा मिनाक्षी निकम नेमक्या काय म्हणाल्यात ?
https://www.facebook.com/508992935887325/videos/911290089638554