चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी कृती समितीतर्फे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
शेतकरी कृती समितीतर्फे तहसीलदारांना आज निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे उडीद, मुग आदींसह अन्य पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रूपये इतकी नुकसान भरपाई द्यावी. तसेच तालुक्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्यामुळे तालुक्याची आणेवारी ५० पैशांच्या आत लाऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर विवेक रणदिवे, नाना पाटील, दीपक पवार, डॉ. रवींद्र मराठे, भूषण पाटील, गोरख पारधी, सुनील पाटील, दिनकर जाधव, शिवदास पाटील, रावसाहेब पाटील, प्रशांत पाटील, पुंजाराम पाटील, डिगंबर देवरे व गायत्री पाटील या शेतकरी कृती समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षर्या आहेत.