चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदी येथील इंडो-तिबेटीयन बॉर्डर फोर्समध्ये कार्यरत असणारे जवान संभाजी धर्मा पानसरे यांचा नाशिक येथे उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.
जवान संभाजी धर्मा पानसरे ( वय -३१ रा. शिंदी ता. चाळीसगाव ) हे नुकतेच ४ जानेवारी रोजी एक महिन्याची सुटीवर आले होते. १४ जानेवारी रोजी त्यांना अचानक पोटाचा त्रास होऊ लागल्याने शहरातील महावीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान तेथेही शरीराची प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी आज साकाळी ११ वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
संभाजी पानसरे यांच्या पार्थिवावर दिनांक २७ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या मूळगावी शिंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचा पश्चात पत्नी, तीन वर्षाची एक मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.