चाळीसगाव जीवन चव्हाण । खरं तर ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष निवडणूक लढवत नसतो. समविचारी मंडळी एकत्रीतपणे पॅनल तयार करतात. या अनुषंगाने आजच्या निकालाचे कल पाहिले असता जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट झाल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेषदादा पाटील म्हणाले. निकालांबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
आज ग्रामपंचायतीच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर, लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना खासदार उन्मेषदादा पाटील म्हणाले की, खरं तर ग्रामपंचायतमध्ये कोणताही राजकीय पक्ष थेट उतरत नाही. तथापि, समविचारी मंडळी एकत्र येऊन पॅनल तयार करतात. याचा विचार केला असता जिल्ह्यात भाजपचे सर्वाधीक सदस्य निवडून आले आहेत. चाळीसगाव तालुक्यातही सर्वाधीक सदस्य हे भाजपचेच निवडून आल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले.
खासदार पाटील पुढे म्हणाले की, विकास हा महत्वाचा असून यासाठी आपल्याकडे कोणताही राजकीय भेदभाव राहणार नाही. सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विकासासाठी आपण सर्वातोपरी मदत करण्यासाठी तयार असल्याचे प्रतीपादन खासदार उन्मेष पाटील यांनी याप्रसंगी केले.
खालील व्हिडीओत पहा खासदार पाटील नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/428014618248360