चाळीसगावात अँटी करप्शनचा ट्रॅप; तहसील कार्यालयातील पंटरसह लिपीक जाळ्यात

चाळीसगाव दिलीप घोरपडे । वारसाचे नाव कमी करण्यासाठी ११ हजार रूपयांची लाच मागणार्‍या येथील तहसील कार्यालयातील लिपीकाला आज पंटरसह रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

याबाबत वृत्त असे की, तक्रारदाराच्या बहीणीच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या उतार्‍यावरील वारसाचे नाव कमी करण्याच्या मोबदल्यात प्रशांत किसन सावकारे, (वय- ३० वर्षे, लिपीक टंकलेखक, तहसिल कार्यालय, चाळीसगाव वर्ग- ३ ) याने ११ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. या अनुषंगाने संंबंधीतांनी अँटी करप्शनकडे तक्रार केली. यानुसार आज प्रशांत किसन सावकारे व त्याचा पंटर यादव केशव पवार (वय-६० वर्षे, खाजगी इसम, रा:- भोजे ,ता.पाचोरा) यांना ११ हजारांची लाच घेतांना अटक करण्यात आली.

ही कारवाई अँटी करप्शनचे डीवायएसपी गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लोधी, सफौ.रविंद्र माळी,पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.मनोज जोशी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्‍वर धनगर.
यांच्या पथकाने केली. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content