जळगाव प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असून चाळीसगाव मतदार संघात तीन तर एरंडोल-पारोळा मतदार संघातून एक उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जळगाव जिल्ह्याती एकुण 176 उमेदवारांनी 279 उमेदवारी अर्ज दाखल केले. आज अर्ज छाननी सुरू असून यात चाळीसगाव येथे 16 उमेदवारांची 27 नामनिर्देशनपत्रे दाखल होती. 16 पैकी 3 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले असून एकूण 13 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध धरण्यात आले आहे. तसेच एरंडोल विधानसभा मतदार संघासाठी एकुण 9 उमेदवारांची 17 नामनिर्देशनपत्रे दाखल होती. 9 पैकी 1 उमेदवाराचे नामनिर्देशन अवैध ठरविण्यात आला आहे. यात मुख्य उमेदवाराचे नामनिर्देशन वैध झाल्याने पर्यायी उमेदवाराचे अवैध ठरविण्यात आले आहे. एकूण 8 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आले आहे.