चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत प्रगती पॅनलने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या चाळीसगाव एज्युकेशन पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल शहरातील आ. बं. विद्यालयात मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हि प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी संस्थेचे एकूण ८ हजार ४१४ मतदारांपैकी फक्त ५४५३ मतदान झाले असून एकुण ६४.०७ टक्के मतदान झाले.
यानंतर आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. यात सध्या सत्तेवर असणार्या प्रगती पॅनलला घवघवीत यश मिळाले आहे. यात अध्यक्ष व उपाध्यक्षपदी प्रगती पॅनलचे अनुक्रमे रामकृष्ण पाटील आणि मिलींद देशमुख यांची विजय संपादन केला. तर सचिवपदी मात्र परिवर्तन पॅनलचे डॉ. विनोद कोतकर यांनी विजय मिळवला.
उर्वरित विजयी उमेदवारांमध्ये
सुरेश स्वार – सिनियर पेट्रन
बाळासाहेब चव्हाण – सिनियर पेट्रन
भोजराज पुंशी – पेट्रन
निलेश छोरिया – पेट्रन
योगेश अग्रवाल – व्हा. पेट्रन
प्रदीप अहिरराव – व्हा. पेट्रन
नारायनभाऊ अग्रवाल – फेलोज
योगेश करंकाळ – फेलोज
क. मा. राजपूत – सर्वसाधारण
मु. रा. अमृतकार – सर्वसाधारण
नानाभाऊ कुमावत – डोनर
अशोक वाणी – डोनर
जितेंद्र वाणी – डोनर
भूषण ब्राह्मणकर – डोनर
डॉ. सुनिल राजपूत – डोनर
यांचा समावेश आहे. यातील व्हाईस पेट्रनच्या जागा आधी बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर, उर्वरित जागांसाठी निवडणूक झाली. यात प्रगती पॅनलने बहुमता प्राप्त केले. तथापि, महत्वाचे असणार्या सचिव पदावर परिवर्तन पॅनलच्या डॉ. विनोद कोतकर यांनी बाजी मारली. तर बाळासाहेब चव्हाण – सिनियर पेट्रन; डोनर गटातनू भूषण ब्राह्मणकर आणि डॉ. सुनील राजपूत यांनी देखील विजय संपादन केले. तथापि, शिक्षण संस्थेवर प्रगती पॅनलचा झेंडा फडकला आहे.