चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील रोहीणी शिवारातील एकाच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेली गाय आणि गोर्हा अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील रोहिणी येथील विलास कारभारी घुगे (४९) यांच्या शेतातील बांधावरील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेला एक गोर्हा व गाय अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. यातील २० हजार रुपये किंमतीचा गोर्हा विलास कारभारी घुगे तर १५ हजार रुपये किंमतीची गाय रामहरी गंगाधर काटे रा. रोहिणी यांच्या मालकीची होती.
विलास कारभारी घुगे हे २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुरांना चारा पाणी करून झोपण्यासाठी घरी निघून गेले. मात्र सकाळी ६ वाजता शेतात आले असता त्यांना गोरा व गायी खुट्याला बांधलेले दिसून आले नाही. त्यावर घुगे यांनी परिसरात आजपावेतो शोधाशोध केली. परंतु जणावरे मिळून न आल्यामुळे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानक गाठून घुगे यांनी भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पगारे हे करीत आहेत.