चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कलम-४९८ अंतर्गत दाखल खटल्यात मदत करण्यासाठी चार हजार रूपयांची लाच स्वीकारतांना येथील सहायक फौजदार तसेच पोलीस कर्मचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भात वृत्त असे की, एका ५५ वर्षाच्या व्यक्तीच्या मुलीला विवाहानंतर सासरी त्रास होत होता. यामुळे तिने सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात आम्ही मदत करून यासाठी तिच्या वडिलांकडे सहायक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे आणि पोलीस नाईक शैलेश आत्माराम पाटील यांनी पाच हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर चार हजार रूपये देण्याचे ठरले. तर या प्रकरणी संबंधीत व्यक्तीने अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. यानुसार एसीबीच्या पथकाने आज सापळा रचला.
या सापळ्यात अनिल रामचंद्र अहीरे, वय-५२, सहा.फौजदार, नेम-चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग-३ रा.वैष्णवी पार्क, चाळीसगांव. ता.चाळीसगाव आणि शैलेष आत्माराम पाटील, वय-३८,पोलीस नाईक, नेम-चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग-३ यांना लाच घेतांना अटक करण्यात आली. ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत एस.पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, एन.एन.जाधव , पोलीस निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली संजोग बच्छाव, झख.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली.