चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कंटेंनरसह जप्त केलेल्या गुटख्याचे राजस्थानपर्यंत धागेदोरे जुडले असल्याचे तपासात दिसून आले असून अटक करण्यात आलेल्या वाहकाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून गुटख्याने भरलेला कंटेनर पकडला होता. कंटेनरमधून सुमारे ८२ लाख २५ हजारांचा गुटखा पकडला असून याप्रकरणी कंटेनरचालक सर्फुखान इद्रिस खान (रा. राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. . या कंटनेरमध्ये १३० प्लास्टिक बारदानात एकुण ८२ लाख २५ हजार १०० रूपयांचा गुटखा होता. हा गुटखा व २० लाखांचा कंटेनर असा सुमारे १ कोटी २ लाख २५ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला न्यायालयाने ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चाळीसगावसह परिसरात गुटख्याचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची नेहमीच चर्चा होत असते. याआधी गुटखा विक्रेत्यांवर कारवाया करण्यात आल्या असल्या तरी थेट कंटेनर भरून गुटखा जप्त करण्याची ही पहिलीची कारवाई असल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे. तर या गुटखा प्रकरणाचे धागेदोरे हे राजस्थानपर्यंत पोहचल्याचेही दिसून येत आहे. आता पोलीस कोठडीतील तपासातून यातील इतर अनेक पैलू देखील समोर येण्याची शक्यता आहे.