चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण असतांना पक्षाचे कार्यकर्ते संजय भास्कर पाटील यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज त्यांनी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे चाळीसगावात चर्चा असलेली भाजपामधील बंडखोरी टळली असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण हे जरी असले तरी भाजपाचे पंचायत समिती उपसभापती असलेले संजय भास्कर पाटील यांनी बंडखोर म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. संजय भास्कर पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपामध्ये बंडखोरी होणार अशी सर्व चाळीसगाव तालुकाभर चर्चा असतानाच आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 2.45 वाजता संजय भास्कर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने सर्व चर्चांना विराम मिळाला असून भारतीय जनता पार्टीमध्ये होणारी बंडखोरी आज टळली आहे. संजय पाटील यांचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी तालुकाध्यक्ष केली साळुंखे समाधान पाटील भूषण भोसले आदी उपस्थित होते.