Home Cities जळगाव चैत्र महोत्सव २०२६ : लेवा बोर्डिंगमध्ये उद्यापासून भव्य प्रदर्शन व मेळावा 

चैत्र महोत्सव २०२६ : लेवा बोर्डिंगमध्ये उद्यापासून भव्य प्रदर्शन व मेळावा 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चैत्र महिन्याच्या उत्सवी वातावरणात जळगाव शहरातील नागरिकांसाठी आजपासून एक खास पर्वणी सुरू होत आहे. विश्वशांती समूहाच्या वतीने दोन दिवसीय भव्य प्रदर्शन व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून खरेदी, मनोरंजन आणि सौंदर्यसेवेचा अनोखा संगम येथे अनुभवता येणार आहे.

हा मेळावा दि. ११ व १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत लेवा बोर्डिंग हॉल, नंदिनीबाई शाळेजवळ आयोजित करण्यात आला आहे. विविध प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा उद्देश ठेवून या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध स्टॉल्सवर सहज खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

मेळाव्यात ज्वेलरी, आकर्षक कपडे, वाळवणी पदार्थ, पापड-लोणचे, शुद्ध तेल व तूप, पर्स, क्रिस्टल्स तसेच कॉस्मेटिक्स यांसारख्या विविध वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. घरगुती गरजांपासून ते फॅशन आणि लाइफस्टाइलशी संबंधित उत्पादनांपर्यंत सर्व काही येथे उपलब्ध असणार असल्याने महिलांसह सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी हा मेळावा खास ठरणार आहे.

या मेळाव्याचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट मानसी जोशी यांचे मार्गदर्शन. ‘मानसीस् रॉयल लुक ब्युटी पार्लर’च्या माध्यमातून त्या महिलांना सौंदर्यविषयक टिप्स देणार असून ब्युटी पार्लर सेवांवर तब्बल ५० टक्के सवलतही देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आयोजकांनी या मेळाव्यात येणाऱ्या नागरिकांसाठी फॅमिली फ्रेंडली वातावरण तयार केले आहे. कुटुंबासोबत खरेदी, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि आनंददायी वेळ घालवण्यासाठी हा मेळावा उत्तम पर्याय ठरणार आहे. आकर्षक व परवडणाऱ्या दरात दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून नागरिकांकडून मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चैत्र महिन्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाला नागरिकांनी आपल्या कुटुंबीय व मित्रांसह आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन विश्वशांती समूहाच्या वतीने करण्यात आले आहे. हा मेळावा खरेदीसोबतच एक आनंददायी अनुभव देणारा ठरणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.


Protected Content

Play sound