फिट इंडीया फ्रीडम रनमध्ये मनिष पाटील यांना सहभाग सन्मानपत्र

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते मनीष विजयकुमार पाटील यांची फिट इंडीया फ्रीडम रन या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी नोंदवल्याबद्दल सन्मान करण्यात आला आहे.

क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मार्फत दि.१५ आँगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आलेल्या “फिट इंडीया फ्रीडम रन”या उपक्रमात चालणे या क्रीडा प्रकारात डोणगाव किनगाव रोड वरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव व किनगाव येथील व्यंकटेश बालाजी एंन्टरप्रायजेस संचलीत व्हि.मार्ट शाँपींग माँलचे संचालक मनिष विजयकुमार पाटील यांनीही सहभाग नोंदवला.

यात मनिष पाटील यांनी ६.३० किलो मीटर चालणे या उपक्रमात १:००:०५ यावेळात पुर्ण करून उत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने त्यांचे प्रमाणपत्रही मनिष पाटील यांना देण्यात आले. मनिष पाटील यांच्या या स्पर्धेतील यशस्वी सहभागाबद्दल स्कूलचे चेअरमन तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयकुमार देवचंद पाटील, प्राचार्य अशोक पाटील, संजय उधोजी क्रिडा शिक्षक दिलीप बिहारी संगेले व शिक्षक आणि शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा देवुन अभिनंदन केले.

Protected Content