चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील करगाव येथील आश्रम शाळेत कवायत निरीक्षणासाठी निघालेले जि. प. केंद्रप्रमुख यांचा भरधाव येणा-या डंपरच्या धडकेत जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही घटना धुळे- सोलापूर महामार्गावर आज (दि.28) रोजी
सकाळी 7 वाजता घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लखीचंद एकनाथ कुमावत (वय-५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कुमावत हे जि.प.मेहुणबारे बिटचे केंद्रप्रमुख असून श्रीराम नगर येथे राहतात. ते करगाव येथील आश्रम शाळेत कवायत निरीक्षणासाठी जाण्यासाठी निघाले असून त्यांना घेण्यासाठी येणा-या शिक्षकाची वाट पाहात उभे होते. दरम्यान तितक्यात धुळे कडून भरधाव वेगात असलेल्या डंपरने (क्र.एम.एच.१९सीवाय ६६११) कुमावत यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, त्यात कुमावत यांच्या जागीच मृत्यु झाला आहे. यानंतर डंपर चालक जागेवरून पळ काढणार तितक्यात त्याला जामावाने पकडत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अजितकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.