मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । नागपूर जिल्ह्यात कामठी तालुक्यातील ‘गादा’ या गावात ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यघटना दुरूस्त करून ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी केली.
याप्रसंगी बोलतांना, “१९५० पासून कोणत्याही सरकारने ओबीसींची जगनणना केलेली नसून केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्यघटना दुरूस्ती करत एससी, एसटींची होते तशी ओबीसींची जनगणना करावी अशी मागणी केली.
या मेळाव्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही उपस्थिती होती. त्यानी सर्वच समाजातील लोकांनी केंद्राच्या खासगीकरणापासून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने भर उन्हात दुपारी शेतावर ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याने सामान्य नागरिकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. मेळाव्यात काँग्रेस आणि भाजपच्या विदर्भातील ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली.