आर्यन युवा फाउंडेशनतर्फे स्मशानभूमीची स्वच्छता

पाचोरा प्रतिनिधी । मान्सून पुर्व नगरपालिकडून शहरातील गटारी नालेंसह इतर साफसफाई होणे अपेक्षित होते. मात्र, याप्रकारचे कोणतेच दृष्ट दिसून आले नाही. म्हणून समाजाशी असलेल्या बांधिलकीचे भान ठेवत शहरातील सामाजिक सेवा करणार्‍या तरूणांचा ग्रुप आर्यन युवा फाउंडेशन तर्फे एकमेव हिंदु स्मशानभुमीत या कोरोना महामारीच्या काळात जे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ते आर्यन ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेतुन स्वच्छ करून समाजासमोर नवीन आदर्श उभा केला आहे. 

स्मशानभूमीतील व परिसरातील या घाणीच्या साम्राज्यामुळे या परिसरात दुर्गंधी वाढली होती. लवकरच मान्सूनचे आगमन होणार असुन येणार्‍या काळात पावसामुळे त्या भागातील घाण उचलणे व स्वच्छता करण्या संदर्भात अनेक अडचणी उभ्या राहू शकल्या असत्या तसेच त्या घाणीमुळे साथीचे आजार व परिसरातील तसेच शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे लक्ष्यात घेऊन आर्यन युवा फाउंडेशन तर्फे दि. २४ मे २०२१ रोजी पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देऊन ही व्यथा मांडली होती. त्यांनी दोन दिवसात ही समस्या सोडवु असे आश्वाशीतही केले होते. पण आज १२ दिवस होऊनही नगरपालिका प्रशासनाने या विषयाचे गांभिर्य लक्षात न घेता कोणतीही उपाययोजना केली नाही. या १२ दिवसाच्या कालावधीत आम्ही मुख्याधिकारी यांचेशी सतत संपर्क साधला पण त्यांनी फक्त अश्वासन दिले. प्रत्यक्षात कोणतीही कृती झाली नाही. 

नगरपालिकेने पाचोरा शहरातील स्वच्छतेचा ठेका ज्यांना दिला आहे. त्यांच्याशीही ह्या तरुणांनी संपर्क साधला माञ त्यांनीही वेळ काढुपणा केला. या अधिकारी व ठेकेदाराच्या मनमानी कारभारा विरूध्द आजच जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनीधी यांना तक्रारी करण्यासाठी आर्यन युवा फाउंडेशन चे पदाधिकारी सज्ज झाले असले तरी शहराचे सुज्ञ नागरिक म्हणुन राष्टपिता महात्मा गांधी यांच्या गांधिगीरी मार्गाने आर्यन युवा फाउंडेनशचे पदाधिरकाऱ्यांनी शनिवारी शहरातील एकमेव हिंदु स्मशानभुमितील व परिसरातील घाणीची स्वच्छता करून एक अभिनव उपक्रम राबविला आहे. ही गांधीगीरी केल्यावरही पाचोरा नगरपालिका प्रशासन जे झोपेचे सोंग घेऊन झोपी गेले आहे. ते जागे झाले नाही तर पुढील वेळेस हा कचरा सबंधित अधिकारी यांचे दालनात व नगरपालिका प्रशासकिय इमारतीच्या आवारात आणुन टाकण्याचे धाडसही आर्यन युवा फाउंडेशनतर्फे करण्यात येईल. असे या तरुणांकडून सांगण्यात आले.  

आर्यन युवा फाउंडेशनच्या या गांधीगीरी उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छ व सुरक्षित शहर या मोहीमेत अध्यक्ष आर्यन मोरे, उपाध्यक्ष भूषण पाटील, सचिव आनंद शिंदे, अशोक मोरे, मोहीत देवरे, दिपक सोनवणे तालूका अध्यक्ष, सोयगाव, भूषण पाटील, वरखेडी अध्यक्ष निशांत वणारसे, सारोळा अध्यक्ष दिपक पाटील, ऋषीकेश कोळी, शूभम पाटील, सोहिल तलवार, हेमंत भोई, मनोज भोई, देवेंद्र देवरे, निलेश पाटील, तेजस देवरे, बबलू अंभोरे, किरण पाटील, राहूल पाटील, ललीत पाटील, रोहित सूतार, अनिकेत चौधरी, शारूख शाह, पवन शिंदे, रोहिदास गायकवाड, सोमनाथ पाटील, मयूर बारी, अविनाश शिंदे, गोपाल भडांगे, कौशल निकम यांनी सहभागी होऊन जे नगरपालिका प्रशासनाचे करावयास हवे ते काम करून दाखवल्याने आता तरी नगरपालिका झोपेतून जागे होऊन मान्सून पूर्व तयारीस लागून लोकांच्या जिवाशी खेळणे थांबवले का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Protected Content