दिपोत्सवाने चकाकली अमळनेर नगरी !

अमळनेर प्रतिनिधी । सदगुरू संत सखाराम महाराज समाधी शताब्दी सोहळ्यात हभप दादा महाराज जोशी जळगाव यांनी पारायणाची सांगता केली. याच्या शेवटी दीपोत्सवात शहरातील हजारो भाविकांनी सहभाग घेतला.

संत सखाराम महाराज द्विशताब्दी समाधी सोहळ्यात काल महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी ७-३० वाजता पंधरा मिनिटे दिपउत्सव कार्यक्रमात ३००० भाविकांनी भाग घेऊन दिव्याने आजुबाजुचे वातावरण लखलखीत, आनंदमयी करून उर्जा बचतीचा संदेश दिला. यामध्ये आबालवृध्द सहभागी झाले. अमळनेर शहरातील व तालुक्यातील नागरिक व महिलांनी पंधरा मिनिटे विजेचे दिवे बंद करून पणत्या दिवे देवासमोर लावून शुभम…. करोति… कल्याणम… मंत्र म्हणून एक वीज बचतीचा संदेश दिला.
२१ एप्रिल ते २९ एप्रिल २०१९ या कालावधीत श्री संत सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला. दरम्यानच्या कार्यक्रमात अनेक विविध राज्यातील संत महंत उपस्थित राहिले.स्मरणीका ग्रंथ प्रकाशन, भव्य शोभायात्रा, चतुर्वेद पारायण,तुकाराम महाराज गाथा पारायण, प्रवचन,किर्तन,१०८ कुंडात्मक श्री महाविष्णू पंचायतन याग,यज्ञपूर्णाहूति,भव्य नेत्र तपासणी शिबीर, दिव्यांगांना नित्योपयोगी साहित्य वाटप,भव्य रक्तदान शिबीर, वृक्षारोपण शिबीर, भव्य क्रिडा स्पर्धा,मरणोत्तर नेत्रदान संकल्प फार्म,दररोज बारा हजार नागरिकांना अन्नदान कार्यक्रम असे विविध कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रसाद महाराज यांनी व त्यांच्या संचालक मंडळानी कडक उन्हात उत्कृष्ट नियोजन केल्याने कार्यक्रम यशस्वी झाला.अमळनेर तालुक्यातील अनेक भाविक, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पत्रकार, शिक्षक,शेतकरी व्यापारी यांनी कार्यक्रमात यथाशक्ती मदत केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक अनिल घासकडबी, दिलीप देशमुख, राजेंद्र देशमुख, जयवंतराव मोडक, राजेंद्र भामरे,पवन शेटे,उदय देशपांडे, बाबा देशमुख यांनी प्रयत्न केले.

Add Comment

Protected Content