धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजपा) मोठे यश मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर धरणगाव शहरात महायुतीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. शनिवारी, ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला माल्यार्पण करून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी महायुतीचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उत्सवात भाजपाचे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील, जिजाबराव पाटील, शिवदास पाटील, दिलीप महाजन, कन्हैया रायपूरकर, अॅड. वसंतराव भोलाणे, शिवसेनेचे पदाधिकारी विलास महाजन, पप्पू भावे, बुट्या पाटील, बाळू जाधव, चंदन पाटील, अनिल महाजन आदी उपस्थित होते. या वेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीच्या जनतेने दिलेल्या कौलाचे स्वागत केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. विजयोत्सवात कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला.