रावेर प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीच्या आवारात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त भगवा ध्वजची गुढी उभारण्यात आले. गुढीचे पूजन करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सभापती कविता कोळी, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
रावेर पंचायत समितीसह सर्व ग्राम पंचायतीवर ६ जून शिवराज्यभिषेक दिनानिमित्त भगवा ध्वजची गुढी उभारुन पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे सभापती कविता कोळी गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी पं.स. सदस्य दिपक पाटील, योगेश पाटील, जितेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भगवा ध्वजच्या गुढीला सर्व पदाधिकारी अधिकारी यांनी अभिवादन करुन महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत गायले. हरलाल कोळी, सहाय्यक गटविकास अधिकारी डी.एच. सोनवणे, चोपडेकर, डी.आर. महाजन यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.