शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शेंदुर्णी अहिर सुवर्णकार समाज मंडळ व अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी नरहरी सोनार यांची ७३६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सुवर्णकार समाजातील जेष्ठ मार्गदर्शक काकासो. बबन बंडू बाविस्कर यांनी सपत्नीक महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करून समस्त सुवर्णकार बांधवांसोबत आरती करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस समाज अध्यक्ष श्रीपाद विसपुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर विष्णूशेठ दुसाने यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. सदर कार्यक्रम स्थळी समाजातील जेष्ठ मार्गदर्शक बबन बंडूशेठ बाविस्कर यांचा माजी समाज अध्यक्ष भगवान अहिरराव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर सौ. इंदूबाई बाविस्कर यांचा सत्कार जेष्ठसदस्या सुनंदा विसपुते यांच्या हस्ते साडी व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. उपस्थित समाजबांधवांनी भजन गाऊन महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
त्यानंतर रात्री 8 वा. ह.भ.प. कन्हैया महाराज ( शेंदुर्णी ) यांचे त्रिविकम महाराज मंदिर येथे सुश्राव्य किर्तन झाले. दत्तात्रय अहिरराव यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला तर भजनी मंडळांचा सत्कार महेश बिरारी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंडळाचे कार्यध्यक्ष संजय विसपुते यांनी केले तर आभार मंडळांचे खजिनदार राजेंद्र विसपुते यांनी केले. कार्यक्रमाला महिला, पुरुष भाविक भक्त मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.