Home Cities धरणगाव भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांचा धरणगावात भाजपातर्फे आनंदोत्सव ( व्हिडीओ )

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांचा धरणगावात भाजपातर्फे आनंदोत्सव ( व्हिडीओ )


धरणगाव (प्रतिनिधी) आज पहाटे आपल्या हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करत ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याच्या कामगिरीबद्दल येथील भाजपा शाखेतर्फे जल्लोष करण्यात आला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय महाजन,पालिका गटनेते कैलास माळी सर व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख टोनी महाजन यांनी ही माहिती कळवली आहे.

पहा– भाजपने केलेल्या आनंदोत्सवाचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound