एरंडोल प्रतिनिधी । ग्रामीण उन्नती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ख्रिसमस नाताळ सणानिमित्त मोठ्या जल्लोष करण्यात आला आहे.
यावेळी विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. Std Nr.kg to Std 1st या विद्यार्थ्यांनी जिंगल बेल जिंगल बेल या गाण्यावर डान्स सादर केला. तसेच Std 2 to 8 विद्यार्थ्यांनी ख्रिसमस संबंधित क्राफ्ट ॲक्टिव्हीटी सादरीकरण करण्यात आले. तसेच त्या वस्तूंचे प्रदर्शन मुलांना दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन रुपाली जाधव यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन गोपी गोल्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती वडगावकर यांनी केले. येशू सेंट मेरी यांच्या विषयी माहिती सांगितली, सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट व केक वाटप करण्यात आले. तसेच माध्यमिक उन्नती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते व संस्था अध्यक्ष सचिन विसपुते यांनी उपक्रमाचे कौतुक केले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप, हिना सय्यद, कविता पाटील, अश्विनी महाजन, आशा पाटील, गौरी सोनार, ममता सुतार यांचे अनमोल सहकार्य लाभले.