खुबचंद सागरमल विद्यालयात जागतिक योग दिवस साजरा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक योग दिनानिमित्त शहरातील खुबचंद सागरमल विद्यालयात जागतिक योग दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा तथा विशेष सरकारी वकील ॲड स्वाती निकम यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

यावळी विशेष सरकारी वकील ॲड स्वाती निकम यांनी यांनी योग साधना, प्राणायाम आणि सुर्यनमस्कार यांची सविस्तर माहिती व फायदे सांगून मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिके दाखवून त्यांच्याकडून योगासन, प्राणायाम आणि सुर्यनमस्कार घेण्यात आले. शाळेच्या वतीने स्वाती निकम यांना वृक्ष भेट देवून विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक योगिनी बेंडाळे, पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, शिक्षक लक्ष्मीकांत महाजन, योगेद्र पवार, कल्पना देवरे, क्रीडा शिक्षक विजय पवार, प्रवीण पाटील, सुनील साळवे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक निखिल जोगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content