Home आरोग्य चाळीसगावात जागतिक मृदा दिन साजरा

चाळीसगावात जागतिक मृदा दिन साजरा

0
62

chalisagaon 1

 

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात आज दि.५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला असून यानिमित्त पंचायत समिती डीआरडीए हॉल येथे कृषी विभाग चाळीसगावतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, पुढच्या पिढीसाठी मृदा संवर्धन गरजेचे आहे. आरोग्यासाठी चांगल्या मातीतील सकस धन-धान्य निर्माण होऊ शकते. आपण सारे मातीतील लोकं आहोत. मातीच्या आरोग्यासाठी आपण सारे मिळून काम करूया. माती प्रयोगशाळेत तयार होऊ शकत नाही, मातीचा एक-एक कण तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी केमिकलचा वापर कमी होण्यासाठी मातीचे संवर्धन होणे गरजेचे आहे. कृषी विकासासाठी चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या लोकसेवक कर्मचाऱ्यांचा सत्कार असून पुढील वर्षापासून मोठ्या प्रमाणात मृदा दिन साजरा करण्याचा संकल्प केला जाईल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर दिनेश बोरसे, संजय पाटील, साठे यांनी देखील मृदा दिनाच्या अनुषंगाने आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मंगेश चव्हाण, पंचायत समिती सभापती दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, तालुका कृषी अधिकारी सी.डी.साठे, सहाय्यक गटविकास अधिकारी अजय पवार, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर पवार, तंत्र सहाय्यक ए.आर.चंदिले, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश महाजन, धनंजय मांडोळे, अनिल नागरे, भैय्या पाटील, संजय पाटील व शेतकरी बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound