पाचोरा येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात

पाचोरा  – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा तालुका राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

आज दि. १६ फेब्रुवारी रोजी शहरातील विविध ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुलुख मैदान तौफ बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली तसेच कार्याध्यक्ष भानुदास विसावे, जिल्हाध्यक्ष नाना मोरे, पांडुरंग बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुका राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी शहरातील विविध भागात राष्ट्रीय चर्मकार संघाचे तालुका अध्यक्ष गोवर्धन जाधव, उपाध्यक्ष विठ्ठल नन्नवरे, सचिव सुपडु सावंत सह त्या – त्या परिसरातील भगिनी व बांधव यांनी आवर्जून हजेरी लावत संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन प्रतिमेचे पुजन करत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधवांनी जयंती निमित्त तमाम नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

 

Protected Content