यावल येथे शिवसेनेचा ५३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

0ed3be3e f7a1 4fba a980 e0a419752861

यावल (प्रतिनिधी) येथे तालुका शिवसेना शाखेच्या वतीने आज (१९ जून) शिवसेनेचा ५३ वा वर्धापनदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने येथील शिवसेना कार्यालयात तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने हिन्दु हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.

 

याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील मुस्लीम बहुसंख्य अशा खिरनीपुरा प्रभागात नागरिकाना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पात्रांचे वाटप करण्यात आले. याशिवाय शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना यावल तालुकाप्रमुख रवी सोनवणे, शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, उपजिल्हा संघटक नगरसेवक दीपक बेहेडे, तालुका उपप्रमुख शरद कोळी, शिवसेना शहर उपप्रमुख संतोष धोबी, शहर उपप्रमुख मोहसिन खान, उप तालुका संघटक पप्पु जोशी, युवासेना शहरप्रमुख सागर देवांग, उपशहरप्रमुख प्रविण बडगुजर, सागर बोरसे, योगेश पाटील राजपूत, विजय कुंभार, सचिन कोळी आदी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content