जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसहभागातून गावात स्वच्छतेची चळवळ उभी राहू शकते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत यांनी केले कानळदा ग्रामपंचायत अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता ही सेवा स्वच्छ, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्ताने स्वच्छ भारत दिवस साजरा करताना केले.
प्राथमिक आरोग्य केन्द्र कानळदा येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रकल्प संचालक(पा व स्व) डॉ. सचिन पानझाडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद पांढरे,नेहरू युवा केंद्राचे नरेंद्र डागर,वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर दुसाने,डॉ शीतल कदम,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ आकाश परदेशी, डॉ. दीपाली सोनवणे, डॉ. सचिन झोपे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री अंकीत यांनी स्वच्छता ही सेवा अभियाना दरम्यान जिल्ह्यात सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.विनोद ढगे आणि सहकारी यांनी स्वच्छतेचे महत्व पथनाट्य द्वारे पटवून दिले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राची श्रमदानाद्वारे स्वच्छता सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी करून स्वच्छतेची शपथ घेतली.