मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील जी. जी. खडसे महाविद्यालयात 21 जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालय व श्रद्धा योग महिला मंडळामार्फत करण्यात आले होते.
प्राचार्य व्ही. आर. पाटील यांनी शारीरिक व मानसिक विकासासाठी प्रत्येकाने योग करणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. प्रतिभा डाके यांनी याप्रसंगी उपस्थितांना योगासने ,प्राणायाम ,याचे प्रात्यक्षिक दाखवून प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, महिला ,यांच्या कडून करवून घेतले. याप्रसंगी योगाची शास्त्रीय माहिती देण्यात आली.
यापुढे महाविद्यालयात नियमित योग वर्ग सुरू राहील तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व नागरिकांनीही याचा लाभ घ्यावा असे प्रा.डॉ. प्रतिभा ढाके यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ .एच.ए. महाजन, उपप्राचार्य डॉ. ए.पी.पाटील, डॉ. एस.एम.पाटील,प्रा.डी.आर.कोळी, प्रा.विभा पाटील, श्रद्धायोग महिला मंडळ सदस्या व विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले.