पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील बहादरपूर येथील रा. का. मिश्र विद्या मंदिरात श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्सहात साजरा करण्यात आली.
श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आर. पी. बडगुजर तर वक्ते म्हणून विज्ञान शिक्षक एस. बी. चौधरी हे होते. श्री संत जगनाडे महाराज यांचा जीवनपट त्यांच कार्य, समाजातल्या चाली रूढी-परंपरा याविषयी जनजागृतीवर व त्यांनी लेखन केलेल्या ग्रंथांवर गुरु-शिष्य अशा अनेक घटकांची माहिती यावेळी दिली. आभार व्ही. जी. पवार तर सूत्रसंचालन आर. एस. चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी हजर होते.