संस्कार परिवारातर्फे गीता जयंती उत्साहात; गीता जन्मोत्सवात २६० जणांचा सहभाग

sanskar bahrti news

जळगाव प्रतिनिधी । ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु..यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत” .अशा गीतेतील विविध अध्यायांचा निनाद, त्यातील सार, प्रत्येक अध्यायानंतर होणारा शंखध्वनी अशा पवित्र वातावरणात रविवारी दुपारी गीता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. संस्कार परिवारातर्फे घेण्यात आलेल्या गीता पठण कार्यक्रमामुळे वातावरण पवित्र झाले होते.

मानवाला जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या भगवद्गगीतेची रविवारी ८ रोजी जयंती होती. अनादी काळापासून गीतेचे अनन्य साधारण महत्व आहे. शहरातील संस्कार परिवारातर्फे रविवार ८ डिसेंबर रोजी भगवदगीता जयंतीनिमित्त गीता पठणाचा कार्यक्रम आयोजित होता. सुरुवातीला गो पूजन, गीता ग्रंथ पूजन करून संकीर्तनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमात लहान मुलांपासून ते सर्व वयोगटातील व्यक्तींचा सहभाग होता. गीतेमधील सर्व 18 अध्याय विविध संघटनांतर्फे पठण करण्यात आले. या कार्यक्रमाचे यंदा ७ वे वर्ष होते. १८ संघटनांच्या २६० लहान मुलांपासून जेष्ठ नागरीकांनी गीता पठण करून वातावरण भक्तीमय केले. यामुळे धार्मिक क्षेत्रात या उपक्रमाची विशेष नोंद झाली.

यांनी केले गीता पठण
भगवदगीतेतील सर्व अध्याय गणगौर महिला मंडळ, संस्कार परिवार, उज्वल स्प्राउटर, पंचमुखी हनुमान मंदिर, राजस्थानी, प्रेमनगर, आदर्श, गजानन, गुजराती महिला मंडळ, अयोध्या नगर माहेश्वरी महिला मंडळ, स्वर्णकार वर्मा समाज, दत्त कॉलनी गीता परिवार, उज्व इंग्लिश स्कूल, आदिशक्ती मंडळ, अखिल भारतीय मारवाडी मंच, दुर्गा सप्तशती महिला मंडळ, पाळधी महिला ग्रुप, तरसोद कन्या मंडळाच्या विद्यार्थिनी, जळगावचे गोपग्वाल ह्या संघटनानी म्हटले. ४ वर्षाच्या मुलापासून ते ९० वर्षाच्या व्यक्तीपर्यंत गीता अध्याय पठणात सहभागी होते.

लहान मुलांनी वेधले लक्ष
कार्यक्रमात संस्कार परिवाराच्या लहान 3 वर्षापासूनच्या बालकांनी उत्तम व न अडखळता गीतेतील 12 वा अध्याय म्हणून दाखविला. यावेळी उपस्थित महिला भाविकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले.

Protected Content