भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग सहाचे चौपदरीकरणामध्ये शंभर घरे, शाळा, दवाखाना, पोलीस चौकी, बालवाडीसह इतर सार्वजनिक वापरात येणाऱ्या रस्त्यांसह झाडे अतिक्रमणात उध्वस्त केले. याला आज एक वर्ष पुर्ण झाले असून आज ‘वर्ष श्राध्द’ करण्यात आले.
गेल्या २६ जानेवारी२०२० रोजी शासनाने आणि हायवे कंपनीने “उघडयावर टाकले” सर्व उघडे राहून शासकीय झेंडावंदनांच्या कार्यक्रमांत शांततेत लोकशाही मार्गाने हजेरी लावली होती. आज दि. २६ जानेवारी२०२१ रोजी उध्वस्त झालेल्या घरांच्या प्रती संवेदना म्हणून “वर्ष श्राद्ध” करण्यात आले. दिपक मंडवाले, यांनी पिंडदान करून, शिव हनुमान मंदिर मध्ये सरकारचा व हायवे कंपनीनी वर्षभर कोणतेही सकारात्म काम न केल्याचे “कढीखिचडी” चे जेवण ठेवण्यात आले. सर्वानी सरकारचा व हायवे कंपनीचा कढी खिचडी खाऊन, आबूस तोंड करुन निषेध केला. सदर कार्यक्रमाला कढी खिचडीची व्यवस्था फाऊंडेशनचे किरण मिस्तरी यांनी केल. दुःखवटा वैशाली ठाकूर यांनी आणला होता. संपत मेढे यांनी ही पिंडदान केले. गोकूळपाटील, विकास खडके, आरती जोहरी, निर्मलासुरवाडे, सीमा चौधरी इत्यादी मोठ्या संख्येने दुःखी घर तुटणारे हजर होते . शेवटी चंद्रकांत चौधरी यांनी पुढील आंदोलनांची दिशा सांगून, किरण मिस्तरी यांनी आभार मानले.