चोपडा येथे महाआरतीने संताजी महाराज जयंती साजरी

WhatsApp Image 2019 12 09 at 4.15.33 PM

चोपडा, प्रतिनिधी | श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ८ डिसेंबर रोजी जयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाआरतीचा भव्य कार्यक्रम श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाजा तर्फे कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाआरतीला माजी आमदार डाॅ.सुरेश पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, चोपडा सुतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील, चोपडा पिपल्स बॅकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी उपस्थित होते. तसेच चोपडा नगर परिषदेच्या अध्यक्षा मनिषा चौधरी, गटनेते जिवन चौधरी, नगरसेवक किशोर चौधरी, सुनिल चौधरी, दिपाली चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संताजी जगनाडे महाराज यांची महाआरती करण्यात आली. यावेळी ज्ञानेश्वरी पारायण व भावदर्शन निरूपण प्रवक्ते ह.भ.प.रविंद्र महाराज दहिवेलकर, ह.भ.प.बापु महाराज लासुरकर व भजनी मंडळी यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भजने व आरती सादर केली. यावेळी श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाजाचे अध्यक्ष के. डी. चौधरी यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. महाआरतीला शिवसेनेचे शहरप्रमुख आबा देशमुख, दिपक चौधरी, काॅग्रेस तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, मधुकर बावीस्कर, सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते विविध संस्थाचे पदाधिकारी, तेली समाजाचे उपाध्यक्ष टी. एम. चौधरी, पदाधिकारी प्रशांत चौधरी, राजेंद्र चौधरी, लक्ष्मण चौधरी, आबा चौधरी, बी. के. चौधरी, नंदु चौधरी, महेंद्र चौधरी, देवकांत चौधरी, विनोद चौधरी, फुलचंद चौधरी, बापु चौधरी, राहुल चौधरी व तेली समाजासह सर्व समाजाचे भाविकांनी महाआरतीस मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.
प्रज्वलीत दिपकांनी चौकात दिवाळीचे स्वरूप आले होते. संताजींच्या जयघोषाने परीसर दुमदुमला होता.

Protected Content