गर्दी टाळून संयमाने रमजान ईद साजरी (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । यंदा कोरोनाच्या त्रासामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर आणि जिल्ह्यात रमजान ईद गर्दी टाळून संयमाने व  साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली . 

 

नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दीत अदा केली जाणारी नमाज यंदा मुस्लिम बांधवांनी कटाक्षाने टाळली . आप्तस्वकीयांच्या भेटीसाठी जाणाऱ्यांच्या वाहनांचीही गर्दी रस्त्यांवर दिसत नव्हती ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठाण न करता त्याऐवजी मुस्लिम बांधव निवासस्थानीच नमाज अदा करीत होते . या सणाचा उत्साह मात्र सर्वत्र कायम होता मात्र त्याला यंदा संयम आणि शिस्तीची जोड होती

 

शहरात अजिंठा चौफुली नजीकच्या ईदगाह मैदानावर निवडक संख्येत आलेल्या मुस्लिम बांधवांचे स्वागत  जिल्हाधिकारी अभिजित  राऊत , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण  मुंडे , माजी उपमहापौर करीम सालार , फारुख शेख , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गफ्फार मलिक  आदी मान्यवरांनी केले .

Protected Content