बुलडाणा, अमोल सराफ | होलिकादहन म्हटले म्हणजे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड देखील होते. मात्र डोनगाव, विठ्ठलवाडी येथे पर्यावरणपूरक पद्धतीने होलिकोत्सव साजरा केला जातो.
वाईट, तामसी विचार जळून चांगल्या, सात्विक भावनेचा विजय म्हणजेच होळी. वसंत ऋतूत फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा होलिकोत्सव साजरा केला जातो. रंगांना उधाण आणणाऱ्या रंगपंचमीला सुरुवात होण्याअगोदर येणारा होलिकोत्सव संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज निसर्गाच्या संवर्धनाच्या भूमिकेतून होळीत बदल होतांना दिसून येतोय. हि आनंदाची बाब आहे. होळीचा सण आला की विशेषता बच्चे कंपनीला उत्साहाच उधाण येतं.
मातीची आजकाल अनेकांना एलर्जी होते त्यापासून आपण दूर जात आहोत. मात्र ग्रामीण भागात हसत खेळत मातीत शेण एकत्रीकरण करून त्यापासून चांदोबा, कुत्र्याचे कान, नारळ आदी आकारात विविध चाकोल्या तयार करून होळीच्या दिवशी त्याचे दहन केल्या जातात. होलिकादहन म्हंटले त्याकरिता बरेच प्रमाणात वृक्षतोड देखील होते. पण हे सर्व पर्यावरण करता हानिकारकच आहे.
याकरता बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव विठ्ठलवाडी गावामध्ये आजही शेणापासून तयार केलेल्या पारंपारिक लोप पावत चाललेल्या चाकोली होळीची परंपरा कायम आहे. जवळपास चाळीस ते पन्नास वर्षापासून याच पद्धतीने शेनापासून विविध आकाराच्या चाकोली बनविल्या जातात. विविध नावांनी प्रचलित या शेणाच्या चाकोल्याच्या माळा करून होळीच्या दिवशी संध्याकाळी त्या होळीमध्ये अर्पण केल्या जातात. यामुळे वृक्षतोड थांबून पर्यावरणला हानी पोहोचत नाही. याकरता हे गावकरी आपल्या आजच्या पिढीला याचा होळीबाबत महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी होळीची परंपरा आजही टिकवून आहेत.
अशा करतात चकोल्या –
बच्चे कंपनी दोन- दोनच्या जोडीने समोरासमोर बसून आपल्या बोटांच्या चोकोनी, त्रिकोणी यासह विविध आकाराच्या चाकोल्या तयार करतात.
नारळ तयार करताना मजबूतीसाठी त्यात छोटासा दगड टाकतात.
दहा ते बारा चाकोल्या तयार झाल्या की त्या उन्हात वाळून त्याची माळ तयार केली जाते.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/499924845002274