शांततेत बकरी ईद साजरी करा – पो.नि.प्रदीप ठाकुर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील मुस्लिम बांधवांची बकरी ईद या सणाच्या निमित्ताने आपल्या वतीने विविध धर्मियांच्या भावना दुखावल्या जाऊ नये याची काळजी घेवुन सर्व नागरीकांनी शहरात शांतता प्रस्थापित करावी असे आवाहन येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी रविवारी सकाळी येथील पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित शांतता समिती सदस्यांच्या बैठकीत केले आहे.

१७ जुन रोजी मुस्लिम समाज बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्याच्या वतीने रविवारी दिनांक १६ जुन रोजी सकाळी ११ वाजता येथील पोलीस ठाण्याचे आवारात शांतता समिती सदस्यांची सभा आयोजित केली होती. याप्रसंगी पोलीस निरीक्षक ठाकुर म्हणाले बकरी ईद दिवशी दोन धर्मियामधे कोणताही वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.सर्व धर्मीयांनी शांतता ठेवण्यास सहकार्य करावे. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून कोठे अशांतता असल्यास नागरीकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहनही पो. नि. ठाकुर यांनी केले. अशांतता /अफवा पसरवणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. पशूंचे अवषेशाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना त्यांनी आदेश दिले.

यावल तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.आर.सी.भुगुरे, शांतता समितीचे सदस्य डॉ. निलेश गडे, हाजी शब्बीर खान, हबीब मंजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शांतता समितीच्या बैठकीस जेष्ठ शांतता समिती सदस्य हाजी शब्बीर खान, भाजपाचे माजी शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, यावलचे माजी उपनगराध्यक्ष हाजी इकबाल खान नसीर खान, भाजपा शहराध्यक्ष राहुल बारी, शे.आतीम मो.रफीक, हाजी गफ्फार शहा, अय्युब खान शब्बीर खान, मो.शफी,गुलाम रसुल हाजी दस्तगीर, हबीब मंजर, रहीम रजा,सईद शाह रहेमान शाह (भुरा ), समीर खान, शे.युसुफ, मोहसीन खान, पराग सराफ यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.

Protected Content