कोरोना रुग्णांच्या अचानक मृत्यूचे कारण ; हायपोक्सीया

 

नवी दिल्ली, वृत्तसेवा । देशातील एक प्रमुख रुग्णालय असलेल्या ‘इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ मध्ये कोविड १९ मुळे झालेल्या मृत्युंवर एका वेगळ्या दृष्टीकोनातून अभ्यास सुरू करण्यात आलाय. याचं नाव आहे ‘हायपोक्सिया’ .

हायपोक्सिया किंवा हॅप्पी हायपोक्सिया एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीर किंवा शरीरातील कोणत्याही एका विशिष्ट भागाला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. एम्सच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये कधीकधी रुग्णांनाही आपल्या स्थितीसंदर्भात संकेत मिळत नाहीत आणि जेव्हापर्यंत हे त्यांच्या लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्याचाच परिणाम म्हणून रुग्णाचा अचानक मृत्यू ओढावतो. ही एक अशी स्थिती आहे जी कोविड १९ च्या अनेक रुग्णांमध्ये आढळून आलीय.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रक्ताच्या गुठळ्या झाल्यानं किंवा फुफ्फुसातील धमन्यांत अचानक अडथळे निर्माण झाल्यानं आणि हृदयातील क्रियेत अडथळे आल्यानं रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णांच्या श्वासोच्छवासाची गती वारंवार तपासावी लागते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. रुग्णांनी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय चालण्याची परवानगी देऊ नये, असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे.

Protected Content